March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.16) – बजाजनगर परिसरातील शिवछत्रपती विद्यालयात पालकसभा व पालकांची कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 13 जुलै रोजी मोरे चौकातील ‘मसिआ ‘ हॉल येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका माननीय विद्या भोसले होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे व तज्ञ मार्गदर्शक म्हणून किशन वतनी, संस्थेचे उपाध्यक्ष जाधव सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनएसएसई परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या शिवछत्रपती विद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात विद्या भोसले यांनी विद्यार्थ्यांचा आहार, आरोग्य आणि चांगल्या सवयी यासंबंधी पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. यावर आपले मत व्यक्त केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तज्ञ मार्गदर्शक किशन वतीने यांनी उपस्थित पालकांना संबोधून ‘सक्षम मुल कसे घडवाल ? ‘भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित पालकत्व आणि भविष्यात उपलब्ध असणाऱ्या संधीसाठी आपण तयार असणे. याद्वारे आपण आपल्या पाल्याचे उज्वल भविष्य घडवू शकाल. अशी प्रखर मते आपल्या भाषणात मांडली.
शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत झालेल्या या पालक सभा कार्यशाळेत सर्व प्रमुख पाहुण्यांचे अश्विनी करंजे, नागेश कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया कोळी यांनी केले.

शाळेतील शिक्षक गणेश लोंढे, सारिका डोंगरे, रेवती तायडे, अर्चना भगत, सुरेखा राजमाने, स्वाती शिरसाठ, संध्या ढवळे, शिंदे वनिता, काटकर पुष्पा, ताठे निकिता, पवार पूजा, निकिता धनुकार, अरुणा खडसे व शांती तुपशेंद्रे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *