March 23, 2026


वाळूज महानगर : संततधार कोसळलेल्या पावसामुळे पाणी पातळी वाढली. आणि शिरोडीचा पाझर तलाव फूटण्याच्या स्थितीत आला. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेत तलावातील पाण्याला जेसिबि मशीनच्या सहाय्याने वाट करून दिली. त्यामुळे गावावर आलेले संकट टळले. आणि गावाकऱ्यांनी सुटकेचा स्वास सोडला.

दोन दिवसापूर्वी संततधार कोसळलेल्या पावसाने तुर्काबाद परिसरातील मलकापूर, शिरोडी येथील नदी, ओढे, नाले यांना पूर आला. त्यामुळे शिरोडी येथील बोरगाव रस्त्यालगत असलेला पाझर तलाव तुडुंब भरून तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. हा प्रकार लक्षात येताच सतर्क गावकऱ्यांनी महसूल व लघु पाटबंधारे विभागाला माहिती दिली. तोपर्यंत गावातील काही तरुणांनी मातीचा भराव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही माहिती मिळताच लघु पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता शरयू आरदवाड, तालुका कृषि अधिकारी बी जे जायभाय, सहाय्यक कृषि अधिकारी व्ही जे चव्हाण, तुर्काबाद सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी साईनाथ गवळी यांनी शिरोडी पाझर तलावाची पाहणी करून जेसीबी मशीनच्या सहाय्याने तलाव्या च्या सांडवा मोकळा करून पाणी जाण्यास वाट करून दिली. यावेळी शिरोडी, मलकापूर,राजुरा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच भाऊसाहेब हिरामण माळी, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय लक्ष्मणराव बोबडे, विजय पंढरीनाथ वैद्य, देविदास कुशाराम फोलाने, रावसाहेब हिरामण माळी, करण रावसाहेब माळी, अंकुश वैद्य, सुनील फोलाने, राजेंद्र फोलाने, संतोष वैद्य, भगवान कर्डिले, नामदेव, दिगंबर बत्तीशे, रामराव फौलाने आदींची उपस्थिती होती.

मोठी दुर्घटना टळली –
हवामान खात्याने दिलेला इशारा आणि संततधार रात्रभर कोसळलेला पाऊस, यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लघु पाटबंधारे विभाग, कृषी अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उपाय योजना केल्यामुळे शिरोडी येथील पाझर तलाव फूटता फुटता बचावला. त्यामुळे शिरोडी गावावर आलेले मोठे संकट टळले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *