वाळूजमहानगर, (ता.19) – बजाजनगर मधील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ संजय सांभाळकर यांची भारतीय जनता पार्टीच्या भाजप शिक्षक आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर दक्षिण जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय खांबायते यांनी सांभाळकर यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी भाजप शिक्षक आघाडीचे मराठवाडा संयोजक प्रा संजय भातलवंडे, मराठवाडा सहसंयोजक ज्योती तुपे, उत्तर संयोजक रंगनाथ लघाने, शहर संयोजक प्रा शाकीर राजा यांची उपस्थिती होती.