March 23, 2026

       बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे जाहीर सत्कार

 

वाळूज महानगर (ता.8) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 व 4 नोव्हेंबर 2025 रोजी ज्युदो हॉल कीटली गार्डन छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शालेय विभागीय ज्युदो स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटात ऑर्चिड इंग्लिश स्कूल बजाजनगरची खेळाडू कु. आराध्या भाऊसाहेब जाधव हिने विभागीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

कु आराध्या जाधव हिने 14 वर्ष वयोगटामध्ये तर 36 किलो वजन गटामध्ये शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर श्रीनिवास नंदमुरी, ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल रेणुका काकडे, क्रीडा शिक्षिका मनीषा भारती, राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामनोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे उपाध्यक्ष गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भीमाशंकर नावंदे, रामकिसन मायंदे, डॉ. रेखा परदेशी, सुजाता गुल्हाने, पुनम नवगिरे, गीता साखरे, सचिन पुरी, गणेश पाळवदे, सदानंद सावळे, अरुण भोसले, बळीराम राठोड, मुकेश बनकर, शेख शकिल, बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास जाधव, बीएसएफचे कोषाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, समाधान हराळ, बीएसएफचे उपाध्यक्ष अण्णा चव्हाण, मार्गदर्शक दत्त पवार, ओमप्रकाश वाघमारे, रामेश्वर वैद्य, आशिष सुवर्णकार, सौरभ गोसावी, आकाश इंगळे, सुनील बर्डे, सतीश सदावर्ते, कृष्णा पवार, करण लगाने, अशोक धंधर, अविनाश पवार यांनी या खेळाडूचे स्वागत करून पुढील राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कु आराध्या जाधवला राष्ट्रीय पंच अशोक जंगमे, भीमराज रहाणे, सुधीर काटकर, सुप्रिया जंगमे, ऋतुजा सौदागर यांचे मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *