वाळूजमहानगर, (ता.29) – बजाजनगर येथील भगतसिंह हायस्कूल या शाळेचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 93.20 लागला असून देवश्री पठाडे हिने 95.80 गुण प्राप्त करून शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तर स्नेहल देवकर 94.80 व श्रुती जगताप 94.60 गुण प्राप्त करीत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
शाळेतून 51 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 57 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 37 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशिष कटारिया व राजेश कांकरिया होते. शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव दामोदर मानकापे, सहसचिव गंगाधर शेवाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेखाताई भवलकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी वर्गशिक्षक वैभव ढेपे, गोपाल आधाने, हरिश्चंद्र गवळी उपस्थित होते. रामा चोपडे, महादेव लाखे, शहाजी भूकन, आशिष मात्रे, शाळेचे लिपिक प्रकाश वाघ उपस्थित होते.