March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.14) – शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत रांजणगाव (शे. पु.) येथील शहीद भगतसिंह माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश मिळविले. विद्यालयाचा एकूण निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये प्रथम -सुशांत गायकवाड – 98.80, द्वितीय -तेजस पवार -95.80, द्वितीय -स्पर्श काळे -95.80 तर तृतीय -सोनाली मुळे -94. 00 हिने पटकावला.

विशेष म्हणजे वैष्णवी माळवे-93.00, सुरज कांबळे -93.80, ओम बोंबटकर -92.80, नंदनी घोडगे -92.60, आकर्ष काळे-92.20, सौरभ कांबळे -92.00, धुमाळ आदित्य-92.00, भूमिका कांबळे-91.80, अनुष्का कोरडे-91.60, नवनाथ बुधवंत-91.60, क्रिष्णा नेहूल-91.40, दिव्या गोराडे -91.40, संजीवनी सोनकांबळे-90.00, रत्नेश्वर कदम -90.00 या विद्यार्थ्यांनी 90 टक्क्या पेक्षा जास्त गुण मिळवले.

यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक –
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी सैनिक नानासाहेब हरकल, गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, सचिव हर्षित हरकल, मुख्याध्यपिका भारती साळुंके, अक्षय हरकल, शारदा सोनुने यांच्यासह सर्व शिक्षक व पालकांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *