वाळूजमहानगर, ता.21 – बजाजनगर येथील शहीद भगतसिंग इंग्लिश स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहाचा समारोप यु. बी. कंपनीचे सीनियर मॅनेजर बिपिन सुपेकर उपस्थितीत 18 डिसेंबर 2024 रोजी कबड्डीच्या अंतिम सामन्याने झाला.

या कार्यक्रमाला बबनराव सुपेकर, कॉम्रेड विलास जंजाळ, सिटू संघटनेचे मनोहर सनेर, शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख तसेच शहीद भगतसिंग क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या सदस्या रेखाताई भवलकर, शहीद भगतसिंग इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनामिका भवलकर उपस्थित होत्या. या सप्ताहात अनेक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. शेवटच्या दिवशी रंगीत बॉल हातात घेऊन मुलांनी कवायत केली. कबड्डीचा सामना झाला व प्राथमिक विभागाच्या छोट्या बच्चे कंपनीच्या बेडूक उड्या, धावणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुण्यांनी मुलांचे कौतुक करत शालेय जीवनातील व्यायाम आणि शिस्त या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना शेंडे, वैशाली पाटील, राजश्री जाधव, समीक्षा अग्रवाल, अर्चना समरीत, नयना जोशी, प्रणिता फुलझेले, राहुल साबळे, शैलेंद्र रसाळ व रत्ना नरवडे यांचे सहकार्य लाभले.
