वाळूजमहानगर, ता.27 – बजाजनगर येथील शहीद भगतसिंह हायस्कूल मध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा जाधव, रामा चोपडे, रोहिणी पवार, हरिश्चंद्र गवळी उपस्थित होते. प्रथम संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच 26/11 च्या मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयात भारतीय संविधानाचे पठण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव लाखे,वैभव ढेपे,भरत बोडके,शहाजी भुकन,जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, सुनीता साक्रूडकर,हरिशचंद्र गवळी,अतिश डोईफोडे, अंबिका साळवे,सुनील बर्डे, प्रकाश वाघ,विनोद म्हस्के,राहुल साबळे, भाऊसाहेब कोळी,शैलेंद्र रसाळ इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी वैभव ढेपे तर आभार महादेव लाखे यांनी केले.