वाळूजमहानगर (ता.16) :- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांची जयंती व ‘बाल दिन’ निमित्त बजाजनगर येथील शहिद भगतसिंह हायस्कूल, शहीद भगतसिंह प्रार्थमिक शाळा, शहीद भगतसिंह इंग्रजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने बालक्रीडा सप्ताहाचे आयोजन सोमवारी (ता.14) रोजी करण्यात आले.
या बालक्रीडा सप्ताहाचे उद्घाटन शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव दामोदर मानकापे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहीद भगतसिंह हायस्कुलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, प्राथमिकचे मुख्याध्यापक नितीन देशमुख, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अनामिका गोरे, क्रीडाशिक्षक सुनील बर्डे हे उपस्थित होते. प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंह, संस्थेचे दिवंगत अध्यक्ष ऍड. उद्धव भवलकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा सप्ताह 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत आयोजित या बाल क्रीडा सप्ताहामध्ये कबड्डी, खोखो, लांब उडी, रनिंग, हॉलीबॉल, थाळीफेक, गोळा फेक, रांगोळी, किल्ले बनविणे या स्पर्धा होत आहे. स्पर्धेचा समारोप आनंदनगरीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव लाखे, रामा चोपडे, वैभव ढेपे, रोहिणी पवार, चक्रधर डाके, शितल घोडके, राजेंद्र मघाडे, भरत बोडके शहाजी भूकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, अतिश डोईफोडे, गीतांजली डोके, सुनिता साकृडकर, ज्योती बाणेदार, सुवर्णा अहिरे, गोपाळ अधाने, वर्षा बनकर, अश्विनी सुरडकर, वर्षा पाटील, रूपाली नवले, वैशाली पाटील, राजश्री घुले, अर्चना समरीत, रचना पाटील, श्रेया पाठक, अर्चना शेंडे, प्रिया यादव, प्रकाश वाघ, राहुल साबळे, शैलेंद्र रसाळ, भाऊसाहेब कोळी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. रामा चोपडे यांनी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.