वाळूजमहानगर, ता.14 (बातमीदार)- विविध ठिकाणी शटर उचकटून चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करून 8 गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या ताब्यातून 2 लाख 4 हजार 595 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 11 जानेवारी तसेच 12 जानेवारी रोजी वाळूज महानगर येथील मातोश्री मेडीकल, जागृत हनुमान मंदिर, बजाजनगर येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस आयुक्तलाय हद्दित 13 जानेवारी रोजी पेट्रोलिंग करत पडेगाव भागात गेले असता त्यांना वाळूज महानगर परिसरात शटर फोडी करणारे दोन इसम हे सवेरा हॉटेल, कासंबरी दर्गा, पडेगाव येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. शेख सिराज शेख सईद (वय 21) व सोहेल शेख मजहर (वय 25) दोन्ही रा. कासंबरी दर्गाजवळ, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत 2 दोन 4 हजार 595 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला. तो जप्त करण्यात आला.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण वाघ, पोलीस हवालदार विजय निकम, मनोहर गिते, कृष्णा गायके, विजय भानुसे, संतोष चौरे, सोमनाथ दुकळे, महिला पोलीस अंमलदार संजवणी शिंदे यांच्या पथकाने केली.
विविध पोलीस ठाण्यात गुन्हे –
वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे, सिडको पोलीस ठाणे, सिटी चौक पोलीस ठाणे, वैजापूर पोलीस ठाणे, छावणी पोलीस ठाणे, क्रांती चौक पोलीस ठाणे, वडोद बाजार पोलीस ठाणे, उस्मानपुरा पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.