
वाळूज महानगर, (ता.13) – 11 जानेवारी रोजी गरवारे मैदानावर झालेल्या 17 व्या आंतरशालेय व्हेरॉक टी 20 करंडकाच्या अंतिम सामन्यात रविवारी सायंकाळी झालेल्या लढतीत वुडरिज हायस्कूलने आर्चिड इंग्लिश स्कूलवर 6 गडी राखून, व्हेरॉक टी-20 करंडकाचे मानकरी तर ऑर्चिड इंग्लिश स्कूल संघ उपविजेता पदाचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात समरवीर पाटील यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सायंकाळी झालेल्या आंतरशालेय व्हेरॉक टी 20 करंडकाच्या अंतिम लढतीत ऑर्चिड इंग्लिश स्कूलने प्रथम फलंदाजी करताना मधल्या फळीतील अभिषेक घटविसावेच्या 30 धावांच्या मदतीने 20 षटकात 8 बाद 106 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या वुडरिज हायस्कूलने सलामीवीर समरवीर पाटीलच्या 33 धावांच्या मदतीने 11 षटकात 4 बाद 109 धावा करत ऑर्चिड इंग्लिश स्कूलवर 6 गडी राखून विजय मिळविला. विजयी व उपविजेता संघाना आयुक्त अंजली रमेश, व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सतीश मांडे, राहुल टेकाळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
याप्रसंगी स्पर्धा सदस्य अनंत नेरळकर, दिनेश कुंटे, प्रदीप राठोड, सय्यद जमशेद, मच्छिंद्र जाधव आदींची उपस्थिती होती. अंतिम सामन्याचे धावते समालोचन अॅड. श्याम देशमुख व अमृत बिऱ्हाडे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पूजा करवा यांनी केले. 17 वी व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उपविजेता संघ-ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन (बक्षीस 95 हजार रुपये चषक + प्रमाणपत्र) गोरविण्यात आले. व्हेरॉक टी-20 करंडकाचे बजाजनगर येथील ऑर्चिड इंग्लिश स्कूल संघ उपविजेता पदाचे मानकरी ठरत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला. ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसमधील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेबरोबर क्रीडा, नीट, जे ई ई, -(मेन/ऍडव्हान्स), सी ए फॉउंडेशन, स्कॉलरशिप, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा अनेक स्पर्धेत यशाचा ठसा उमटवत आहेत. विद्यार्थीनीच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व शिक्षका तसेच पालक यांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.
