
वाळूज महानगर, (ता.21) – छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे मैदानावर सुरू असलेल्या 17 व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या लढतीत गायकवाड ग्लोबल अकादमीने द वर्ल्ड स्क्रलला 24 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात किडस किग्डमने चाटे स्कूलचा 3 गडी राखून पराभव करून गायकवाड ग्लोबल अकादमी, किड्स किंग्डम यांनी विजयी सलामी दिली.

सुरुवातीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांत 6 गडी बाद 120 धावा केल्या. यात वरद पिवळने 35, देवेंद्रने 26 तर अथर्व मोकाशीने 14 धावा केल्या. द वर्ल्ड स्कूल संघातर्फे प्रणव गंगावणे याने 2, तनिष्क मालानी, अनुज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्यत्तरात द वल्डस्कलचा डाव 18.3 षटकांत 96 धावांत संपुष्टात आला. यात कतार्थ पाडळने सर्वाधिक 29, अभय ठाकरेने 17 धावा केल्या. गायकवाड लोबलतर्फे सामनावीर अथर्व मोकाशीने 2, सोहम गायकवाड, अक्षय जर्डे, सर्वेश, वरद पिवळ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसन्या सामन्यात चाटे स्कूलने निर्धारीत 20 षटकांत 113 धावा केल्या. यात आदित्य बागलने 58, अनिष शिंदेने 11, प्रतिक कदमने 10 धावा केल्या. चाटे स्कलतर्फे सामनावीर साहेबसिंग ग्रंथीने 9 धावांत 3, नवीन गायकवाड याने 4, तर आयुष बोकाडे, आयु चोरडिया यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात किइ्स किग्डमने विजयी लक्ष्य 19 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पर्ण केले. यात तेजस पुरीने 27, आयुष रोकडे व केतन पारखेने प्रत्येकी 19 धावा केल्या. चाटे स्कूलतर्फे ओमकार गोळेने 3 तर आदित्य जोशी, अविनाश देसाई, शुभंकर काळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दरम्यान शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता औद्योगिक गटात आयजीटीआर विरुद्ध स्कोडा तर दपारी 12:30 वाजता जिल्हा वकील विरुद्ध ग्रामीण पोलीस हे सामने होतील. असे स्पर्धा कमिशनर राहुल टेकाळे यांनी सांगितले.
