
वाळूज महानगर, (ता. 6) – तुर्काबाद (खराडी) येथील स्व. विठ्ठल मोहन गंडेपाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढून ‘जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी’. असा गजर केला. या दिंडीमुळे तुर्काबाद येथील गावकऱ्यांचे लक्ष वेधले.

आषाढी एकादशी निमित्त अनेकांची पावले पंढरपूरकडे वळत आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. याचाच एक भाग म्हणून तुर्काबाद (खराडी) येथील स्व. विठ्ठल मोहन गंडेपाटील इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वारकऱ्यासह विठ्ठल, रखुमाईचा गणवेश परिधान केला होता. विद्यार्थ्यांच्या हातात भगव्या पताका, गळ्यात टाळ, विद्यार्थिनींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असे या दिंडीचे आकर्षण होते. लयबद्ध पावली खेळत हरी नामाचा गजर करीत या दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले होते. या दिंडीमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनियर केजीसह 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मोहन गंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या दिंडीच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सचिव कविता पांडुरंग गंडे, उपाध्यक्ष छकुली विठ्ठल गंडे, मुख्याध्यापक अरुण मोतीराम उपळकर, सहशिक्षक संतोष थोरात, अजय संतोष बनकर, अशा काळे, स्वाती भाऊसाहेब शिंदे, शैलेजा पटेल, पुनम अनिल शिंदे, मायादेवी मिलिंद वाव्हळे, गायत्री कृष्णा गंडे, मोनिका तुकाराम रहातटवाड, प्रतीक्षा रामकिसन बनकर, नंदू आवटी, प्रेमभरे आदींनी दिंडीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
