March 23, 2026


बजाजनगर येथील मोहटादेवी चौकातील प्रभुदत्त कॉम्प्लेक्स मध्ये भगवान प्रभू रामाचे पूजन करून सामुदायिक महाआरती घेण्यात आली. महाआरतीनंतर वीस हजार मोतीचूर लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

दिवसभर राम नामाचा जप, भजन कार्यक्रमानंतर सायंकाळी महाआरती व दीपोत्सव आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे साक्षी जाधव गायत्री जोशी व अश्विनी जोशी यांनी काढलेल्या श्रीरामाचे हार्ड बोर्ड रांगोळी ठरले. या कार्यक्रमाचे आयोजन महावीर धुमाळे, योगेश मराठे, राजेश धुमाळे, सुनील जाधव, हरी गायकवाड, भानुदास महाजन, रोहिदास कडेकर,डॉ.लाहोटी, डॉ.इंदे,चिन्मय गंगवाल,अक्षय अकोलकर, संजय पाटील, शंतनु तौर यांनी केले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *