February 4, 2026

वाळुज महानगर, (ता.29) – मुरमी येथील वैष्णवी संतोष निळ या महाविद्यालयीन तरुणीवर अतिप्रसंग करण्याच्या अनुषंगाने निर्घुण खुण करणारा आरोपी नानासाहेब कडूबा मोरे व त्याला सहकार्य करणारे आरोपी यांच्या वरील केस अंडर ट्रायल व फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुण त्याला फाशीची शिक्षा यावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, मुरमी ता. गंगापूर येथील कु. वैष्णवी संतोष निळ वय 17 हिच्यावर घरात घुसून अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने आरोपी नानासाहेब कडूबा मोरे या नराधमाने गळा चिरून तिचा निर्घुण खुण केला. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे,आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने त्याचा इतर सहकार्याच्या सोबतीने नियोजन करुन (रेकी) कु. वैष्णवी हिच्या तोंड्यात रुमाल कोंबुन विळीवर तिचे मुंडके ठेवून मानेवर व पाठीवर पाय देऊन तिचा खुण करुन त्याने नराधमी विकृती केली असल्याचे तिच्या आई वडिलांनी समन्वयकांना भेटी दरम्यान सांगितले.
महाराष्ट्रात अश्या विकृत नराधमाची संख्या व हिंमत वाढत असुन महिला, आया, बहिणी व मुली सुरक्षित नाही. यासाठी महाराष्ट्र गृह खात्याने आता शासनाकडे मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीप्रमाणे *चौरंग* कायदा आणण्याची शिफारस करावी.
अश्या प्रकारणात आरोपी सबळ पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी केसेस तातडीने, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन 90 दिवसात अश्या आरोपींचा *चौरंग* तथा *फाशी* देण्याचा कायदा पारित करण्यात यावा. मुरमी येथील घटनेच्या अनुषंगाने आरोपी सदरील मुलीला मरणोत्तर सुद्धा तिच्या बदनामीला कारणीभूत ठरत असुन तो तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण होईल अश्या पद्धतीने जबाब नोंदवून पोलिसांच्या तपासाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे अश्या आरोपीला अंडरट्रायल केस चालवुन 90 दिवसात आरोप सिद्ध करुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली पाहिजे. तसेच त्यांचावर पोस्कोसह इतर कठोर गुन्हाची कलमे सुद्धा लावावीत‌. या गुन्हातील तपासामध्ये आणि पुरावामध्ये कसर राहणार नाही. याची आपल्या स्तरावरुन काळजी घ्यावी.

तसेचवै ष्णवीच्या कुटुंबीयांच्या जीविताला आरोपी व त्याच्या इतर सहकारी तसेच नातेवाईक यांच्याकडुन धोका असुन, त्यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे. अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मराठा समन्वयक तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके धामोरीकर, झुंजार छावाचे प्रमुख सुनील कोटकर, अशोक वाघ, नितीन कदम, ॲड.सुवर्णा मोहिते, निता शेळके, निलेश धस आदी समन्वयक उपस्थित होते.

———————–

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *