March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.9) – वेल्डन कॉमर्स क्लासेसची श्रावणी मुंदडा हीने सीए फाउंडेशन परीक्षेत भारतातून 17 वी तर छत्रपती संभाजीनगरमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. सी ए फौंडेशन एक्झाम मे 2025 मध्ये बजाजनगर येथील वेल्डन कॉमर्स क्लासेसचा हा दणदणीत निकाल आहे.

भारतात सर्वात कठीण असणारी आयसीएआय (ICAI) च्या वतीने मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन एक्झामचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात बजाजनगर येथील वेल्डन कॉमर्स क्लासेसचा परंपरेनुसार याही एक्झाम मध्ये रिझल्ट दणदणीत लागला. या परीक्षेत श्रावणी मुंदडा हिने 400 पैकी 340 गुण घेऊन भारतामधून 17 वी येण्याचा मान मिळवला. तर ती छत्रपती संभाजीनगरमधून सर्वप्रथम आली. तिला सी ए आनंद काबरा, प्रो. चंद्रकांत जाधव, प्रो. श्याम जाधव, सी ए प्रीती बंग, सी ए मयूर बजाज यांचे मार्गदर्शन लाभले. सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये नेत्र दीपक यश संपादन केल्याने सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे वेल्डन कॉमर्स क्लासेसचे संचालक प्रा. सचिन घुगे, सीए केदार पांडे, प्रा.अर्जुन हरिश्चंद्रे, प्रा. गोविंद देशमुख, प्रा.विकास निकम यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच सर्व शिक्षकांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *