March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 5) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.5) मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेत संपूर्ण वाळूज महानगरातून वेलडन कॉमर्स क्लासेसचा याही वर्षी 100 टक्के निकाल लागला.

बारावीच्या बोर्ड परीक्षेत वेलडन क्लासेसची पायल काकडे हीने 95% अकाऊंट आणि संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून वाळूज महानगरातून सर्वप्रथम घेण्याचा मान मिळवला.

तेजस कदम याने 92.3% व अकाउंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तर आदित्य काकडेने 91.7% अकाउंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

तसेच प्रतिक्षा गायकवाड व ऐश्वर्या कलगुंडे या दोघींनी 90% गुण मिळवले. विशेष म्हणजे बारावीच्या बोर्ड परीक्षेत वेल्डन क्लासच्या 25 विद्यार्थ्यांनी 85% च्या वर गुण मिळवून यश संपादन केले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे वेलडन क्लासेसचे संचालक प्रा. सचिन घुगे, सीए केदार पांडे, प्रा. गोविंद देशमुख, प्रा .अर्जुन हरिश्चंद्र, सीए आनंद कावरा, सीए प्रीती मुंदडा, सीए मयूर बजाज, प्रा .विकास निकम, प्रा .चंद्रकांत जाधव, प्रो. श्याम जाधव, प्रा.ज्योती शिंदे आदींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *