February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.13) – महिला असो की पुरुष, वय झाले की, त्यांना फक्त देवाची आस लागते. आणि म्हणूनच उतार वयात अनेक जण तीर्थयात्रा करतात. मात्र प्रत्येकाच्या नशिबात ही तीर्थयात्रा नसते.

वृद्धाश्रमातील तर सर्वच या यात्रेपासून वंचित असतात. परंतु बकवालनगर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांना तीर्थ यात्रेची ही संधी मिळवून दिली. त्यांच्या या उपक्रमाचे वाळूज परिसरातून कौतुक होत आहे.


वाढदिवस म्हटला की, मोठा गाजावाजा. मोठमोठे बॅनर, पोस्टर, कॉकटेल पार्ट्या आणि सर्वच काही. मात्र नायगाव- बकवालनगर येथील जोगेश्वरीचे माजी सरपंच, गंगापूर पंचायत समिती सदस्य आणि गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश दळवी यांनी वाढदिवसाच्या फुजूल खर्चाला फाटा देत एक अनोखा उपक्रम राबवला. आणि तो म्हणजे वृद्धाश्रमातील आजीआजोबांसाठी तीर्थाटन.

याच तीर्थाटणा अंतर्गत योगेश दळवी यांनी श्री म्हसोबा महाराज वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी खास ‘श्री गजानन महाराज दर्शन’ची व्यवस्था केली. नव्हे नव्हे तर, ते स्वतः या आजी-आजोबांसोबत बसमध्ये बसून तीर्थयात्रेला गेले. आणि त्यांची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण केली. या तीर्थयात्रेमुळे वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व उत्सुकता दिसून आली.


प्रथम जोगेश्वरीचे माजी सरपंच तथा उद्योजक अमोल लोहकरे, गजानन बोंबले, यात्रेचे आयोजक योगेश दळवी, माझी पंचायत समिती सदस्य पुष्पा दळवी आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व श्रीफळ फोडून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नितीन दळवी, 

पुजा दळवी, खुशी दळवी, कृष्णा दळवी यांच्यासह संदिप पठारे, सुरेश केरे, अनिल जमधडे, सलिम शेख, दिपक गिरी, मनिष येसलोटे, राम जाधव, किरण मगरे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *