March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.9) – सामाजिक वनीकरण विभाग व सामाजिक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्व के व्हि हिंगणकर नानानानी पार्क बजाजनगर येथे महावृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या वृक्ष लागवडीसाठी वन विभागातर्फे एकशे पंचवीस विविध देशी प्रजातीच्या रोपांचे योगदान देण्यात आले.


या संयुक्त उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल पाटील, तालुका कृषी अधिकारी मेघश्याम गुळवे, वनपाल शिवाजी चव्हाण, सपना गवंडर, मेटलमॅन ऑटोचे एव्हिपी अनिलकुमार डहाळे, योगेश भुतेकर यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष गजानन नांदुरकर यांनी परिसरातील नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार केशव ढोले यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रवींद्र शेलगावकर, अमर निकम, विश्वनाथ धोंडगे, सदाशिव पाटील, नंदकुमार कुलकर्णी, परमेश्वर गणाचार्य, व्यंकटेश भोरे, माणिक कुंभार, नितीन शेळके, सुरेश वंजारी, प्रकाश भगत, सावता अवघडे, रामेश्वर जोशी, ऋषीकेश पाटील, रमेश थोरात, पोपटराव थोरात, अनिल देसाई, सुरेश शिंदे शाळीग्राम गव्हाड, लालचंद अवताडे, भाऊसाहेब अवचरमल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास रेखा हिंगणकर, रेखा नांदुरकर, वैशाली अवघडे, संगीता पाटील, शालीनी ढोले, लता माळी, जयश्री घाडगे, मनिषा निकम, संगिता आवटे, शशिकला कळमकर, आशा दबडे, शोभा निकम, सुवर्णा पाठक, रजनी ठाकरे, दिलीप दबडे, विकास पाटील, लक्ष्मण शिंदे, प्रदिप माळी, आसाराम करपे, श्रीनिवास कळमकर आदिंची उपस्थित होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *