
वाळूजमहानगर, ता.8) -थोर स्वतंत्र सेनानी वीर सावरकर यांचा कर्नाटक विधानसभेतील फोटो हटवून अवमानकारक विधान केल्याबद्दल प्रियंक खरगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाळूज येथे शुक्रवारी ता.8 रोजी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. 
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, किशोर धनयात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन दरम्यान पोलीस निरीक्षक वाळूज यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी भाजपा सरचिटणीस अनिलभैया चोरडिया, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष नंदा राजपूत, गंगापूर पंचायत समितीचे सदस्य तथा बाजार समितीचे संचालक दीपक बडे, संगीता पाटील, ज्योती गायकवाड, सुनिता जोशी, रवींद्र चव्हाण, शंकरराव पारदे,
अमोल शिंदे, सतीश पाटील, रामेश्वर मालुसरे, अविनाश गायकवाड, जनार्दन गांधीले, बाबासाहेब शिंदे, रतन बत्तीशे, मोहन सोनवणे, दत्तू पाटील, गंगासागर गायकवाड, आशीर्वाद रोडगे, शंकर खोतकर, अरुण घाटे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी प्रियंक खरगे, राहुल गांधी व काँग्रेस पार्टी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
