March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.6) – केबल (बस्ट) खराब झाल्याने 9 ते 10 ट्रान्सफार्मर बंद पडले. त्यामुळे साजापूर परिसरातील जवळजवळ दहा नागरी वसाहती गेल्या चार दिवासापासुन अंधारात आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह गर्मी, डास मच्छरांचा सामना करावा लागत असल्यामुळे संतप्त नागरीकांसह महिलांनी विज वितरण कार्यलयावर सोमवारी (ता.6) रोजी मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

वाळूज महानगर सबस्टेशन मधुन निघणाऱ्या
सिडको वाळूज महानगर ग्रोथ सेंटर-2 या फिडरवरून दौलताबाद सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या साजापूर गट नंबर मधील क्रांतीनगर, स्वस्तिकनगर, कृष्णाईनगर, स्वस्तिकसिटी, संघर्ष कॉलनी असे 9 ते 10 ट्रान्सफार्मर जोडलेले आहेत. शुक्रवारी (ता.3) रोजी केबल (बस्ट) खराब झाल्याने साजापूर परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला. त्यामुुळे जवळजवळ 10 नागरी वसाहती गेल्या चार दिवासापासुन सतत अंधारात राहावे लागले.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे रात्रभर गर्मी व डासाचा समाना करत नगारीकांनी रात्र जागत काढवी लागली. विशेष म्हणजे विजे अभावी विद्युत पंप सुरू होत नसल्याने पाणी टंचाईचासुध्दा महिलाना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या संतप्त झालेल्या नागरीकांनी सोमवारी (ता.6) रोजी महावितरण कार्यलयावर मोर्चा काढला.

आणि संतप्त भावना व्यक्त करत महावितरणा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ऐश्वर्या भुमे, वर्षा भूमी, अर्चना जगताप, गायत्री त्रिभुवन, अनिता पाटील, कविता पाटील, सारिका जगदाळे, शोभा श्रीखंडे, अर्चना गिरी, ज्योती शिंदे, रंजना सोनवणे, सीमा नांद्रे, सोनाली मोकळे, सुनिता पाटील, दिपाली पाटील, करुणा निकम, रेखा राऊत,

अश्विनी सपकाळ, राधा तेलंगे, सीमा झेंडे, रेखा कोर, शिवकन्या गुजर, सुनिता चौधरी, अमृता थापा, रूपाली पाटील, आदिनाथ भूमे, चरणसिंग महाराज, गजानन पाटील,

विकास बुचले, गजानन गोल्हार, कल्याण निकम, समाधान झेंडे, माधव निर्मले, शेषनारायन पवार, महादेव शिंदे, भाऊसाहेब पवार आदीसह महिला व नागरिकांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *