वाळूजमहानगर, ता.28 – बजाजनगर परिसरातील वीज ग्राहकांना विज बिल वितरण करण्यात येत नसल्याने अनेकांना विलंब शुल्काचा भुरदंड सोसावा लागत आहे. परिणामी येथील वीज ग्राहकांनी महावितरण विरोधात आंदोलनाइशारा दिला आहे.
बजाजनगर या नागरी वसाहतीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून वीज ग्राहकांना वीज बिल वितरण करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना नहक विलंब शुल्क भरावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने तत्काळ बजाजनगर रहिवासी क्षेत्रात दर महिन्याला वेळेवर वीज वितरित करावे. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महावितरण ला दिलेल्या एका निवेदनाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे औद्योगिक सेल जिल्हाध्यक्ष अर्जुन आदमाने यांनी दिला आहे.
