
वाळूज महानगर – वारंवार तक्रारी देऊनही सण उत्सवाच्या काळात सुध्दा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने रांजणगाव (शेणपुंजी), जोगेश्वरी व कमळापूर येथील त्रस्त नागरिकांनी गुरुवारी (ता.8) रोजी आक्रोश मोर्चा काढून विज पुरवठा सुरळीत करा नसता, खुर्ची खाली करा. अशा घोषणा देत निवेदन दिले.
गणपती उत्सव व गौरी गणपती म्हणजेच महालक्ष्मी या सण उत्सवाच्या काळातही वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी), जोगेश्वरी व कमळापूर या परिसरातील अनेक नागरी वसाहतीत दररोज सकाळी पाच ते आठ वाजे दरम्यान वीज पुरवठा बंद असतो. परिणामी सण उत्सवातील धार्मिक कार्यक्रम घेता येत नाही. किंवा या कार्यक्रमात व्यत्यय येतो. येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत वेळोवेळी महावितरण कार्यालयात लेखी व तोंडी तक्रार देऊनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यावर आवाज ऊठवण्यासाठी
सामान्य नागरिकांसह संतप्त वीज ग्राहकांच्या वतीने वाळूज येथील महावितरण कार्यालयावर गुरुवारी (ता.8) दुपारी 1 वाजता आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करा, नसता खुर्ची खाली करा. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. अशा विविध घोषणा देत निवेदन दिले.
यावेळी कनिष्ठ अभियंता खंडागळे यांनी मोर्चेकर्यांच्या रोषाला सामोरे जात तात्काळ उपाय योजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी गंगाबाई राऊत, रेणुका ठाकुर, आसिन पठाण, बाळासाहेब सरोदे, सरला बसेकर, रुपाली मोरे, सुनिता शेळके, निर्मला गवते, पुजा गरड, सुनिता हंगे, समदानी शेख, फरजाना शेख, गंगाबाई गुंडे, उज्वला अंभोरे, सविता मगर, सरला वसईकर, सोपान असुरे, रुपाली मोरे, चंदन राजपुत, निकर खंदारे, रमेश सातपुते, केतन साबळे, विजय धुळे, भिकाजी खंदारे, सिताराम राठोड, सय्यद जाकीर, सिताराम लोहकरे, गणेश शेवाळे, मंगल कांबळे, उषा हजारे, माया तपासे, नुरजान पठाण, संगीता कचरे, उषा हिवाळे, वनीता पारदे, सुनिता गाडेकर, सत्यदेवी प्रसाद, जरीना शेख, शोभाबाई चंद्रे, प्रभावती कांबळे, प्रियंका पाईकराव, मनिषा गायकवाड, नंदाबाई कळम, सुनिता खिल्लारे आदीसह दीपक बडे उपस्थित होते.
