
वाळुज महानगर, (ता.2) – फुलंब्री तालुक्यातील एका 41 वर्षीय शेतमजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला घटना शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी दुपारी वाळूज परिसरातील करोडी शिवारात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील करोडी शिवारात असलेल्या टोल नाक्याजवळ एका विहिरीत एक इसम पडला असल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याचे गोरे यांनी शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पदमपुरा अग्निशमन दलास दिली. माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे मुख्य अग्निशमन अधिकारी संपत के.भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर, ड्युटी इन्चार्ज विनायक लिमकर, अग्निशामक जवान विनोद बामणे, लव घुगे, मतीन शेख, रवी दुधे, सचिन फुले, वाहन चालक प्रशांत गायकवाड आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बुडालेला व्यक्तीस विहिरीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्रभाकर छगन चव्हाण वय 41 रा. पाथ्री ता. फुलंब्री असे यातील मयत व्यक्तीचे नाव असून तो शेतमजूर आहे.
