
वाळुज महानगर, (ता.22) – तिसगाव येथील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे कार्यक्रम आयोजन शनिवारी 21 जून रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग संस्थेचे प्रमुख देविदास जाधव, राजू नवले, देविदास जाधव यांची उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, शाळेचे डायरेक्टर अजगर बेग, संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या संचालिका इश्रत बेग मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, योगा केल्याने शरीर व प्राण, शरीर व मन, मन व आत्मा, आत्मा व परमात्मा याचे मिलन करण्याचा जो मार्ग आहे. तो म्हणजे योग. अशी योगाची व्याख्या केली. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आजच्या काळात योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे परिणाम वैद्यकीय दृष्टीकोनातून अभ्यासले जात आहेत. योगाचा उपयोग रक्तदाब, मधुमेह, रद्दयरोग, मानसिक ताण. यावर होणारा परिणाम संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे. नियमित योगा केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लवचिकता, सहनशीलता, मनःशांती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पूनम पाटील, अश्विनी उगले, वंदना चावरे, निशिगंधा तायडे, स्नेहल पाटील, ज्योती कापसे, शुभांगी बावीस्कर, कविता काटापल्ले, आरती डहाळे, शितल खैरनार, ज्योती गायके, गायत्री पवार, सारिका पवार, पूजा कवडे, मयुरी वानखडे, बालिका कांबळे, मीनाक्षी परदेशी, पूजा कवडे, अर्चना पांडे, अनुजा वैद्य, मेगा सुरडकर, व्यंकटेश वैष्णव, श्याम जाधव व शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. कैलास जाधव यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
