वाळूजमहानगर, ता.12 – विस्डम इंग्लिश स्कूल मध्ये क्रीडा दिन क्रीडा महोत्सवाने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, संस्थेचे डायरेक्टर मिर्झा अजगर बेग व श्रीमती बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम विद्यार्थ्यांनी परेड संचालन करून पाहुण्यांचे स्वागत केले. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो- खो, क्रिकेट, मास पीटी, परेड, लिंबू चमचा, रनिंग, लांब उडी, सॅक रेस, स्टिक बॅलन्स, अशा विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा विभाग प्रमुख प्रा.कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेत
बलून रेस मध्ये सई गायकवाड प्रथम, जिविका तुपे – द्वितीय. रनिंग स्पर्धेत शिवांश मुसळे -प्रथम, कृष्णा रॉय – द्वितीय. लिंबू चमचा स्पर्धेत श्रावण रॉय – प्रथम, ओम काळे – द्वितीय. सॅक रेस स्पर्धेत समर्थ ठाकरे – प्रथम, वेदांत राठोड – द्वितीय. बॉल रेसिंग मध्ये सोहेब शहा- प्रथम, शंतनू स्वामी – द्वितीय. हेन रेस स्पर्धेत वैभवी यादव – प्रथम, प्रथमेश निघोते – द्वितीय. लेग रेस मध्ये भावेश भडं – प्रथम, विवेक राठोड – द्वितीय. स्टिक बॅलन्स स्पर्धेमध्ये आरव आगळे – प्रथम, शुभम काळे – द्वितीय. रोप स्किपिंग मध्ये जोधा शेख – प्रथम, सुचिता राठोड -द्वितीय. कोन कलेक्शन स्पर्धेमध्ये नयना पाटील – प्रथम, सार्थक घाईट – द्वितीय. स्क्रिपिंग स्पर्धा मध्ये अनुजा मोगल – प्रथम, प्रतीक्षा सोळंके – द्वितीय. फुटबॉल स्पर्धा मध्ये प्राची आहेर – प्रथम, संस्कृती ताठे – द्वितीय. क्रिकेट स्पर्धेमध्ये कॅप्टन केशव चव्हाण – प्रथम, कॅप्टन अंकुश कुशवाह – द्वितीय आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कतापल्ले, यांनी तर तर आभार प्रा. कैलास जाधव यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पूनम पाटील, चेतना पटेल, अश्विनी उगले, शुभांगी महाजन, आरती डहाळे, निशिगंधा तायडे, ज्योती गायके, स्नेहल पाटील, मीनाक्षी परदेशी, ज्योती कापसे, शितल खैरनार, वंदना चाहुरे, मयुरी घोगले, पूजा कवाडे, बालिका कांबळे, कावेरी लोखंडे, गायत्री पवार, सारिका पवार यांनी प्रयत्न केले.