वाळूजमहानगर, ता.8 – तिसगाव येथील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे मनोबल व आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन शुक्रवारी (ता.7) रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत भरवण्यात आले होते.
या प्रसंगी उद्घाटक म्हणुन डॉ.शंतनू बावस्कर, शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, शाळेचे संचालक अजगर बेग, संचालिका इश्रत बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यानी विज्ञानाचे विविध प्रयोग सादर करून याचा जीवनात कोणकोणते फायदे व उपयोग होतो. हे मान्यवरांना व उपस्थित पालकांना समजाऊन सांगितले. व समता, सखोलता, एकात्मतेचा संदेश देत सर्वांचे मने आकर्षित केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेले भव्य रांगोळी व प्रकल्प दर्शवण्यात आले. तसेच इसाक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, सी वी रमन, आर्यभट्ट आणि रमाबाई यांची रांगोळी काढण्यात आली. तर हायड्रोलिक प्रेशर, इलेक्ट्रिक सर्किट, सोलर सिस्टिम, रेस्पिरेटरी सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फायर एक्स्टिवेशन, वाईन मिल, ग्लोबल वार्मिंग, लेझर सेंसर सेक्युरिटी सिस्टीम, चंद्रयान 3 मॉडेल, इलेक्ट्रिक बेल असे विविध प्रकल्प दर्शविण्यात आले. या प्रदर्शनास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या चेतना पटेल, पूनम पाटील, अश्विनी उगले, वंदना चावरे, निशिगंधा तायडे, स्नेहल पाटील, ज्योती कापसे, शुभांगी बावीस्कर, कविता काटापले, आरती डहाळे, शितल खैरनार, कावेरी खेडकर, ज्योती गायके, गायत्री पवार, सारिका पवार, पूजा कवडे, मयुरी वानखडे, बालिका कांबळे, मीनाक्षी परदेशी तसेच शाळेचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. कैलास जाधव, श्याम जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.