March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – राहते घरी घरगुती कारणावरून रागाच्या भरात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने उपचारार्थ दाखल केलेल्या 25 वर्षीय अविवाहित तरुणीचा सोमवारी (ता.24) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील सहारा व्यंकटेश हाउसिंग सोसायटीत राजेश्वरी वैजनाथ क्षिरसागर ही 25 वर्षीय अविवाहित तरुणी तिची लहान बहिण व आईवडील असे राहत होते. गुरुवारी (ता.20) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजेश्वरी हिने राहते घरी घरगुती कारणावरुन विषारी औषध प्राशन केल्यामुळे ते बेशुध्द झाली. त्यामुळे तिला तिची बहिण ऐश्वर्या क्षिरसागर हिने प्रथम माणिक हॉस्पिटल व नंतर सिडको वाळूज महानगर -1, येथील एका खाजगी रुग्णालयात आणून दाखल केले. उपचार सुरू असताना राजेश्वरी हिचा सोमवारी (ता.24) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. मदनराव अमोल काकडे यांनी दिलेल्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *