February 5, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.24) – राहते घरी रागाच्या भरात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने रामराई येथील एका चाळीस वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान घाटी दवाखाना येथे सोमवारी तारीख 23 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

शिवदास दिंगबर वाघमारे वय 40 वर्षे रा. रामराई ता. गंगापूर या इसमाने 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरी दारूच्या नशेत काहीतरी विषारी औषध सेवन केले. त्यास शंकर रुस्तुम वाघमारे व बाळासाहेब शेषराव वाघमारे यांनी घाटी दवाखाना औरंगाबाद अपघात विभागात आणुन दाखल केले. त्याच्यावर घाटी दवाखान्यामध्ये औषध उपचार चालू असतांना शिवदास वाघमारे याचा सोमवारी (ता.23) रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी सी.बी.सानप यांनी घाटीतून दिलेल्या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्यात या घटने प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कारभारी देवरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *