
वाळूजमहानगर, (ता.12) – कंपनीत काम करताना ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले मात्र शिल्लक कारणावरून त्यांच्यात बेबनाव झाला. त्यानंतर तिचे दुसरीकडे लग्न होताच तुझा संसार होऊ देणार नाही अशी धमकी देत आक्षेपहार्य फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्यागिक क्षेत्रातील एका कपंनीत काम करत असताना 22 वर्षीय तरुणीची अतिथ संभाजी कवडेकर यांच्याशी औळख झाली. दोघे एकत्र काम करत असल्यामुळे त्याच्यात प्रेमसंबध जुळले. पंरतु नंतर किरकोळ कारणावरून त्याच्या वाद झाल्याने तीने त्याच्याशी संबध तोडले. दरम्यान सप्टेंबर 2023 रोजी सखारपुडा होऊन 17 नोव्हेंबर 2023 रोजी लग्न झाले. तेव्हा पासुन अतिथ कवडेकर हा तीच्या व तिच्या पतीच्या मोबाईलवर वारंवार मेसेज करून शिवागाळ करत असे. तसेच तुझा संसार उध्वस्त करेल अशी धमकी देऊन अतिथ याने तीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावाट खाते उघडुन आक्षेपार्ह फोटो टाकून तीची बदनामी केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अतिथ संभाजी कवडेकर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित करीत आहे.
