
वाळूजमहानगर, (ता.27) – एका 28 वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या 6 जणाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुषमा संपत बारगजे या तरुणीचा 3 जुन 2013 रोजी सिडको वाळूजमहानगरातील गणेश नवनाथ बडे या तरुणासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळीनी सुरवातीला काही महिने सुषमा हिला चांगले नांदविले. मात्र काही दिवसांनी सासरच्या मंडळीनी तु आम्हाला आवडत नाही, आम्हाला आमच्या मुलासाठी नात्यातील मुलगी आणायची आहे, तु बळजबरी आमच्या घरात आली. असे म्हणून सुषमा हिस त्रास देण्यास सुरुवात केली. पती गणेश बडे हा सुद्धा पत्नी सुषमा हिस सतत शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याचे सुषमा हिने माहेरी तक्रार केली होती. यानंतर सुषमा हिच्या माहेरच्या मंडळीनी तिच्या सासरी येत समजुत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अपमानित करुन हाकलुन देण्यात आले. दरम्यान वर्षभराने सुषमा हिने मुलगी अविष्का हिस जन्म दिल्यानंतर सासरचा त्रास थांबेल अशी आशा बाळगुन होती. मात्र सासरचा त्रास सुरुच असल्याने सुषमा माहेरी निघुन गेली होती. नातेवाईकांनी मध्यस्थी करुन तिला परत नांदावयास पाठविल्यानंतर सासरच्या मंडळीनी पुन्हा तिचा छळ करण्यास सुरुवात केली. अशातच पती गणेश याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचे समजल्याने सुषमा हिला धक्का बसला होती. तिने पतीच्या प्रेमप्रकरणाची माहिती सासरच्याना सांगितली. असता त्यांनी गणेश याची बाजु घेत तुला पटत नसेल तर निघुन जा, अशी तंबी दिली. मुलगी झाल्यानंतर सुषमा हिच्या सासरच्या मंडळीनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळीनी आम्हाला तुज्याकडून आमचा वंश वाढवयाचा नाही, असे सांगुन दोन वेळा सुषमा हिचा बळजबरीने गर्भपात केला. पती व सासरच्या मंडळीकडून सतत शारिरीक व मानसिक छळ केला जात असल्याने सुषमा हिने भरोसा सेलमध्येही दाद मागितली होती. मात्र तिचा छळ थांबला नाही. त्यामुळे या छळास कंटाळून सुषमा हिने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन तिचा पती गणेश बडे, सासरे नवनाथ बडे, सासु राधा बडे, दिर शंकर बडे, जाऊ अनिता व नणंद शुभांगी भांगे या 6 जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक स्वाती उचित या करीत आहे.
