वाळूजमहानगर, ता.11 – माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत तिसगाव परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी शारिरिक व मानसिक त्रास देवुन तिला व तिच्या आईवडीलांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, योगीराज हॉटेल ए.एस. क्लबजवळ तीसगांव सिडको महानगर -2 येथील दिव्या अंकुश सहजराव (वय24) हिचे लग्न 6 जून 2021 रोजी अंकुश दत्ता सहजराव रा. हातनुर पो. वालुर ता. सेलु जि.परभणी यांच्यासोबत सिडको वाळूज महानगर – 2 येथे झाले होते. लग्नात वडिलांनी पंधरा तोळ्याचे सोने व इतर वस्तु मिळुन 2 लाख रुपये हुंडा दिला. लग्न झाल्यानंतर दिव्या एकत्र कुटंबात तीसगांव तेथे नांदवयास आली. त्यावेळी त्यांच्यासोबत नंनद मिरा बाळु वटाणे रा. हातनुर पो. वालुर ता.सेलु जि.परभणी, नंदोई बाळु वटाणे हे सुद्धा राहत होते. दिव्याच्या म्हणण्यानुसार सासरच्या लोकांनी तीला सुरवातीपासुनच कधीही सुखा समाधानाने वागविले नाही. लग्नात तुझ्या बापाने हुंडा कमी दिला. असे म्हणुन 1 लाख रपये आण. या कारणावरुन शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. आईवडिलांना भिकारचोट म्हणुन अपमाणीत करत. ननंद ही सुद्धा दिव्याला तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावुन देवु. असे म्हणुन धमकावत घरातून हाकलून देत होती. नंदोई तिच्यावर वाईट नजर टाकत. हे सर्व प्रकरण पतीला वारंवार सांगीतले. तरी तो दुर्लक्ष करत. दरम्यान दिव्या व अंकुश यांना एक मुलगा झाला. तेव्हा सुद्धा सासरच्या लोकांनी तीला व आई वडीलांना शिवीगाळ करुन मारहान केली. तेव्हापासुन दिव्या आईवडीलांकडे राहते. पती तीला नांदवयास नेतील या आशेवर तिने तक्रार केली नव्हती. परंतु त्यांनी नांदवयास न नेल्याने दिव्याने भरोसा सेल येथे अर्ज केला. तरीही माझ्या तीला नांदवयास न नेल्याने दिव्याच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी पती अंकुश दत्ता सहजराव, सासरे दत्ता सहजराव, सासु रंजना दत्ता सहजराव, नंनद मिरा बाळु वटाणे व नंदोई बाळु वटाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
