वाळूजमहानगर, (ता.8) – रस्त्याने पायी जाणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणीस आवाज देऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे. असे म्हणून तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या वडिलांना चाकूने भोसकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (ता.7) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील 18 वर्षीय तरुणी आई-वडिलांसह बजाजनगर येथे राहते. ती मोहटा देवी मंदिराजवळील एका कपड्याच्या दुकानात काम करते. 29 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पीडित तरुणी रस्त्याने पायी जात असताना तिच्या ओळखीचा आरोपी सलमान सलीम शेख रा. पंढरपूर हा पाठीमागून आला व तिला आवाज दिला. ती थांबली असता त्याने तिचा हात धरून तिच्या मनात लज्जा वाटेल असे बोलून विनयभंग केला. त्यास नकार देत ती घराकडे जात असताना तिच्या पाठीमागे आला. त्यामुळे ती लगबगिने घरी गेली व वडिलांना सांगितले. त्यानंतर वडिलांनी फोन करून त्यास मुलीला त्रास न देण्याबाबत समजावून सांगितले. शनिवारी (ता.7) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घरी असताना आरोपी सलमान सलीम शेख हा त्यांच्या घरासमोर आला. व त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ करत तुझ्या आई वडिलांना चाकूने मारून टाकीन अशी धमकी देऊन निघून गेला. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी सलमान शेख याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
