वाळूजमहानगर (ता.23) – आई व मुलगा यांच्यासह घरी असलेल्या 23 वर्षीय महिलेच्या घरात घुसून 25 वर्षीय तरुणाने तिचा हात धरून विनयभंग केला. मात्र महिलेने आरडा ओरडा करताच नागरिकांनी पकडून त्यास बेदम चोपले. घटना सोमवारी (ता.21) रोजी बजाजनगर येथे घडली.
बजाजनगर येथील 23 वर्षीय विवाहित महिला वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) परिसरात कंपनीत काम करते. दरम्यान आकाश नारायण गिरी (वय 25) हा नेहमी तिचा पाठलाग करत असे. सोमवारी (ता.21) रोजी पीडित महिला आई व मुलासह घरी असताना आरोपी आकाश गिरी हा तिच्या घरात घुसला व तिचा हात धरून विनयभंग केला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केली असता नागरिक धावून आले. त्यांनी त्यास मारहाण केली. त्यानंतर तो तेथून पळून गेला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी आकाश गिरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
