वाळूजमहानगर, ता.21- आमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून रांजणगाव (शेणपुंजी) येथील माऊंट व्हॅली इंग्लिश स्कूलच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी, पालक, प्रवाशांसाठी अपघात मुक्त रस्ता कार्यशाळेचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून कौतुक करण्यात आले.
रांजणगाव (शेणपुंजी) येथे विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा बसावा म्हणून अपघात मुक्त रस्ता कार्यशाळेचे आयोजन 18 जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण पवार, परिवहन विभागाच्या सहाय्यक परिवहन अधिकारी
सविता पवार, महिला बालकल्याण समिती अध्यक्षा आशाताई शेरखाने कटके, पोलीस निरीक्षक गीताताई बागबडे, विवेक जाधव, उपनिरीक्षक कांचन मिरजे, गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वाघवाड यांची उपस्थिती होती.
सोशल वेल्फर फाउंडेशन रांजणगाव, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, अथर्व मेडिकल तसेच साईनाथ क्रीडा व्यायाम शिक्षण प्रसारक मंडळ शेलुबाजार जिल्हा वाशिम यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक सदावर्ते, साईनाथ जाधव, मोहिनीराज धनवटे, भीमराव कीर्तीकर, प्रभाकर महालकर, अंगणवाडी सुपरवायझर प्रतिभा परदेशीं, अमर तरटे, किरण धिरडे, गणेश शेवाळे, गोविंद चाटे, सोमनाथ नेमाने, विकास सवई, शिवाजी दामोदर, आदेश गरकळ, उमेश बरकुले, अजित बडे, विश्वनाथ घुगे, दत्ता ढाकणे, पवन आघाव, रंगनाथ काळे आवर्जून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग –
या कार्यशाळेमध्ये रांजणगाव (शेणपुंजी) येथील
माउंट व्हॅली इंग्लिश स्कूल, दाक्षायणी विद्या मंदिर, वसंतराव पाटील महाविद्यालय, शंकराव पाटील विद्यालय, पीएम ज्ञानमंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गजानन विद्यामंदिर, जय हिंद पब्लिक स्कूल, जिजामाता स्कूल, साईराम इंग्लिश स्कूल, शिवाजी विद्यालय, शहीद भगतसिंग विद्यालय, राजमाता जिजाऊ प्राथमिक शाळा, हौसाबाई शिंदे प्राथमिक विद्यालय, राजश्री शाहू विद्यालय, शिवतेज विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रमुख मान्यवरांचं लक्ष वेधणारी होती.