
वाळूजमहानगर, (ता.22) – आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. जीवन जगत असताना माणसाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे विशेष लक्ष द्यावेत. असे मत वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी कमळापूर येथील क्रांती पब्लिक स्कूल येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, संचालक गणेश जाधव, बबन जाधव, रत्नाकर फाळके, संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, हनुमान भोंडवे, पंचायत समिती सदस्य दिपक बडे, माजी सरपंच गजानन बोंबले, उद्योजक अमोल लोहकरे, पत्रकार संजय काळे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वेलकम साँगद्वारे पाहुण्यांचे स्वागत करून कोळी गीत, सोशल मीडिया दुष्परिणाम थीम, पंजाबी गीत रामायण, साऊथ इंडियन साँग. अशा अनेक बहारदार परफॉर्मन्स द्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका किरण जाधव, उपमुख्याध्यापिका हर्षमाला निकुंभ, शिक्षिका योगिता रिठे, समन्वयक कांचन काळे, कल्पना तुपे, किरण इंगळे, सारिका काकडे, सोनली प्रधान, शीतल होनराव, वैष्णवी जाधव, तबसुम शेख, क्रांतिश्वर बनकर यांनी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
