February 5, 2026

वाळूजमहानगर – बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयातील 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी माती, विटांचे तुकडे, पुठ्ठे, रंग इत्यादी साहित्याचा उपयोग करून शिवकालीन भुईकोट किल्ले, जलदुर्ग, डोंगरी किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती तयार करून त्या विषयी माहिती विषद केली.

धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक घटकांवर आधारित विविध रंगछटा, नकाशे, ठिपके, चित्रछटांचा वापर करून मुलीनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. बालवर्ग ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविधरंगी कागद, बांबूच्या कामठ्‌याचा उपयोग करून विविध आकारांचे सुरेख आकाशकंदील तयार करून प्रदर्शित केले. तसेच विविध आकाराच्या पणत्या सजवून शाळेत आणून प्रदर्शित केल्या.
विद्यार्थ्यांचे कौतुक
शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विध्यार्थ्यांचे कौतुक केले व सुंदर कलाकृतीला बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. शेवटी दीपावली निमित्त गोड खाऊचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या करिता शाळेतील शिक्षक गणेश लोंढे, नागेश कदम, अमोल चव्हाण, संध्या ढवळे, आश्विनी करंजे, सारिका डोंगरे, पूनम शर्मा, स्वाती शिरसाठ, अर्चना भगत यांनी अथक परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *