
वाळूजमहानगर, (ता.27) – रांजणगाव (शे. पु.) येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कर्ष आहेर व अप्पासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहीदांना दिलेल्या फाशीचा सजीव देखावा सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
विद्यालयात शहीद दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष अक्षय हरकल, प्रभारी मुख्याध्यापक इस्माईल पठाण, प्राचार्या शारदा सोनुने, उद्धव महाराज जाधव यांची उपस्थिती होती. प्रथम शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे करून शहीदांच्या बलिदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहेद पठाण यांनी तर आभार प्रदर्शन भरत शिनगारे यांनी मानले.
