वाळुज महानगर (ता.3) :- वाळुज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यीनींची छेड काढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी परिसरात पोलीस ग्रस्त घालण्यात यावी. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी (ता.3) रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत अनिल सोनवणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहरप्रमुख वाळूज यांच्या लेटर हेडवर दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, वाळूज परिसरातील शिवाजीनगर भागात अनेक शैक्षणिक संस्था, शाळा आहे. या शाळांमध्ये मुलींची संख्या जास्त असून टवाळखोर मुलांकडून मुलींची छेडछाड काढण्यात येते. त्यामुळे मुलींना घरापासून शाळेपर्यंत या टमाळखोरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी परिसरात ग्रस्त घालावी. अशी मागणी करण्यात आली आहे. वाळुज पोलीस ठाण्याचे निरिक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनिषा केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल खरात
यांनी हे निवेदन स्वीकारले. त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर बोरकर पाटील, उप तालुकाप्रमुख मनोज पिंपळे, शहर प्रमुख दलित आघाडी अनिल सोनवणे, विभाग प्रमुख बाळासाहेब चनघटे, उपशहर प्रमुख संजय शिंदे, विश्वनाथ थोरात, उत्तम बनकर पाटील, कैलास पवार, खालिद पटेल, अनिल तुपे, सौरभ वैद्य, किरण पारदे, तुषार थोरात, निलेश बनकर, वैभव रत्नपारखी, अतुल शेळके, रोहील जाधव आदींची उपस्थिती होती.
