वाळूजमहानगर (ता.15) : – महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वाळूज तर्फे स्थानिक महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालयात “आर्थिक समावेशनातून सक्षमीकरण” या केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागामार्फत 15 आँक्टोंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी होत असलेल्या पथदर्शी मोहीमेअंतर्गतचा कार्यक्रम महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चीफ जनरल मॅनेजर संजय वाघ व वाळूज शाखेचे व्यवस्थापक नितीन टेकाडे यांचे ऊपस्थितीत शनिवारी (ता.12) रोजी झाला.
यावेळी शाखा व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी केंद्रशासन व वित्तीय सेवा विभागाचा ऊद्देश सविस्तर पणे सांगून या मोहिमेअंतर्गत येणार्या विविध विमा संरक्षण व कर्ज योजनांची माहिती दिली. केंद्र शासनाचा ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित लोकांना विविध बँकिंग सेवा कमीत कमी दरात पुरवून व प्रभावी तंत्रज्ञानाचा ऊपयोग करून वित्तीय समावेशनाच्या मोहिमेत सर्वांनी ऊत्स्फुर्त सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहनही शाखा व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी यावेळी केले. बँकेचे चीफ जनरल मॅनेजर संजय वाघ यांनी आर्थिक विकासाची यशस्विता ही कोणा एकाची जबाबदारी नसून ही सर्वांच्या विश्वासातून व मदतीतून पार पाडण्याची सामुहिक जबाबदारी व कृती असल्याचे सांगितले. बँकेच्या विविध कर्ज व विमा योजनातून महिलांनी स्वावलंबी होऊन आर्थिक द्रुष्टिने सक्षम व स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करून आपला आर्थिक स्तर ऊंचावण्याचा प्रयत्न करण्याचे प्रतिपादन वाघ यांनी यावेळी केले. माविम कार्यालयाच्या संचालिका देसले-पाटील यांनी बचत गटाच्या महिलांना बँक कर्ज रकमेचा व विमा योजनांचा ऊपयोग कुटुंब व समाज सक्षमीकरणासाठी करावा. असे सांगितले व कार्यक्रमाबद्यल बँकेचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय राऊत व गणेश साबळे यांनी प्रयत्न केले.