वाळुज महानगर, (ता.23) – वाळूज परिसरातील विटावा येथे राहत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील 25 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत रविवारी 22 जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तरंगताना आढळून आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदखेडा, पोस्ट चिंचोली, निळोबा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली, (ह.मु. विटावा, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील आरती लहू कदम वय 25 वर्ष, ही महिला रविवारी 22 जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विटावा येथे विहिरीत तरंगताना बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढून संतोष साळुंखे व अंकुश कदम यांनी तिला उपचारार्थ घाटी दवाखाना, छ. संभाजीनगर येथे अपघात विभागात आणून दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मयत घोषित केले.
याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीतून पोलीस हवालदार एस.आर. गवळी यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशव चौथे करीत आहे.
