February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.17) – जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात करतार राठोड याला सचिन नागरे याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच राठोड याच्या कारवर दगडफेक करून कारच्या काचा फोडल्या व नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (ता.16) रोजी दुपारी विटावा येथे घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर, विटावा येथील करतार भारमल राठोड व सचीन राजेंद्र नागरे हे एकाच गावातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरुन सचिन नागरे याने शुक्रवारी (ता. 16) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास करतार राठोड यास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच करतार राठोड याची चारचाकी कार (एम एच 20, बीसी – 8211) वर शेजारी पडलेला दगड मारून काच फोडुन नुकसान केले. याप्रकरणी करतार भारमल राठोड वय 42 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. विटावा शिवाजीनगर ता. गंगापूर याच्या फिर्यादीवरुन आरोपी सचीन राजेंद्र नागरे विरुद्ध कलम 504, 506, 427 भादंवि. प्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर घुसळे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *