
वाळूज महानगर – हार्वेस्टरची स्वच्छता करीत असताना विजेचा शॉक लागून एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही खळबळ जनक घटना मंगळवारी जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तुर्काबाद (खराडी) येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुर्काबाद (खराडी) येथील ओंकार अंकुश जाधव वय-13 वर्षे हा मंगळवारी 6 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात असलेल्या हार्वेस्टरची स्वच्छता करीत होता. त्यावेळी तो हार्वेस्टरवर चढला असता त्याच्या डोक्याला विद्युत तारेचा स्पर्श होऊन जबरदस्त शॉक लागला. त्यात तो गंभीररित्या भाजून बेशुद्ध झाला. त्याला उपचारार्थ भगवान नवनाथ सोनवणे, आशिष अशोक गवळी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखाना अपघात विभागात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून 9:10 वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. या प्रकरणी पोलीस हवालदार ए. आर. खिल्लारी यांच्या खबरीवरून वाळुज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
