March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.21) – अवैध वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर उलटल्याने त्याच ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना वाळुज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे शनिवारी (ता.21) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवनाथ विठ्ठल परसे वय अंदाजे 26 रा. खवड्या डोंगर. असे ट्रॅक्टरखाली बघून ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. नवनाथ हा शनिवारी (ता.21) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळू (रेती) वाहतूक करत होता. तो चालवत असलेल्या ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने रेतीने भरलेले ट्रॅक्टर खदानीत कोसळून नवनाथ परसे हा ट्रॅक्टरखाली दबला. वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने वडगाव कोल्हाटीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 अवैध वाहतुकीचा दुसरा बळी
वाळूज औद्योगिक परिसरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक स्वरू आहे. महसूल विभागासह सर्वच स्तरातून या अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्या जाते. गेल्या काही महिन्यापूर्वी आंबेलोहोळ येथे अशीच वाळूची अवैध वाहतूक करताना वाळूचा ट्रॅक्टर उलटून चालक ठार झाला होता. त्याचा अजून तपास गुलदस्त्यात असतानाच ही अवैध वाळू वाहतुकीची दुसरी घटना घडली. त्यामुळे वाळूज परिसरातील सरकारी यंत्रणेच्या कामगिरी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
फोटो ओळ – वडगाव कोल्हाटी येथे उलटलेले अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर. (छाया – आर के भराड, वाळुज)

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *