वाळूजमहानगर, (ता.30) :- अवैध वाळू वाहतुकीचा फोटो काढल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी शेंदूरवादा येथील विठ्ठल म्हस्के या पत्रकारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी (ता.30) रोजी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात वाळू माफिया विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.