वाळूजमहानगर (ता.14) : – वाळुज विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकित सर्व चिन्हांना विजयी करून समान कौल दिल्याचा इतिहास मतदारांनी घडवला आहे. या निवडणुकीत आदर्श शेतकरी विकास पॅनलच्या 11 उमेदवारांचे वेगवेगळे 11 चिन्ह तर वाळूज शेतकरी विकास पॅनलच्या 9 उमेदवारांचे एकच चिन्ह होते. या सर्वच 12 चिन्हांवर मतदान केले. त्यामुळे आदर्श विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले तर शेतकरी विकास पॅनलला एका ठिकाणी यश आले. तसेच एक जागा बिनविरोध निवडल्या गेली.
वाळूज, रामराई, लांझी व हिरापूर यांचा समावेश असलेली वाळूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 13 जागांपैकी भागचंद दाणे यांच्या रूपाने एक जागा बिनविरोध निवडण्यात आली. मात्र त्यानंतर दोन पॅनल मध्ये 12 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत
आदर्श विकास पॅनेलने वेगवेगळ्या चिन्हांवर 11 जागांवर निवडणूक लढवली. तर शेतकरी विकास पॅनलने 9 जागांवर एकाच चिन्हावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत 722 मतदारांपैकी 510 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावत आदर्श विकास पॅनलच्या सर्व बारा चिन्हांवर तसेच शेतकरी विकास पॅनलच्या एका. अशा सर्वाच्यासर्व 12 चिन्हांवर मतदान करत सर्व चिन्हांना विजयी करून संधी दिली. या निवडणुकीत आदर्श शेतकरी विकास पॅनेलचे 12 तर शेतकरी विकास पॅनेलचा एक उमेदवार विजय झाला.
विजयी उमेदवार व मिळालेली मते –
भागचंद दाणे (बिनविरोध), मुकेश बोहरा (323), सईदा पठाण (274), ज्ञानेश्वर बोरकर (312), मंगलाबाई आरगडे (239), बबन गायकवाड (269), उदयपाटील चव्हाण (272), भिकचंद देसाई (274 ), नंदा वाघचौरे (248), आसाराम जमधडे (274) तर वाळूज शेतकरी विकास पॅनलचे पैनल प्रमुख काकासाहेब चापे पाटील (225). यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेतन कोष्टी, मतदान केंद्राध्यक्ष सचिन सरवदे, गणेश शेलार, रमेश तागड, संतोष साठे, बी. के. पवार यांनी काम पाहिले.