March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – महाराष्ट्र मराठी हायस्कूल वाळूज येथे 10 वी परीक्षा 1237 केंद्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नबी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.2) रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहारा एज्युकेशन व वैद्यकीय सेवा मंडळ औरंगाबादचे प्रशासकीय अधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक अफसर पटेल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य तोफिक पटेल, शिंदे गट तालुका उपाध्यक्ष नंदकुमार राऊत व ग्रामपंचायत सदस्य पोपट बनकर, आरोग्य सेवक विजय दणके यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधाची पाहणी करून 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *