February 23, 2025

वाळूजमहानगर (ता.9) :- ह्यूमन पिपल टु पिपल इंडिया या संस्थेच्या वतीने वाळूज येथे उपक्रम प्रमुख शंकर गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षित मातृत्व एवं बाल स्वास्थ परियोजना अंतर्गत पोषण आहार कार्यशाळा बुधवारी (ता.9) रोजी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत गर्भवती माता व कुपोषित बालक यांचं आरोग्य कसं सुधारता येईल व आपला देश कुपोषण मुक्त कसा करता येईल. यासाठी संस्थेच्या वतीने विविध पोष्टिक आहार बनवून त्याबद्दल आहारतज्ञ कांचन पटाईत यांनी माहिती सांगीतली.

 

कमी खर्चात जास्त पोष्टिक पदार्थ कसे करता येईल याबद्दलचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच विविध पोषणाचे चार्ट वाटप केले. ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे पाटील व ग्रामपंचायत सदस्य,

 

आशा सुपरवायझर शाईन शेख, आरोग्य सेविका आरती सुर्वे, रंजना कुचे, मनिषा खवाटे, मिना हिवाळे, सुरखा भौर, वैशाली चापे, अर्चना बनकर, दुर्गा चव्हाण, मोमीना सैय्यद, सामिना सैय्यद, कल्पना बोर्डे, संध्या जोशी, आनिता बोरगे यांच्यासह आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *