
वाळूजमहानगर, (ता.10) – नवीन वर्षाचे औचित साधून रोहित जाधव उर्फ बिट्टू भाऊ युवा मंचच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी एकूण 47 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
अविनाश कॉलनी, शिवाजीनगर वाळूज येथील गणपती मंदिराजवळ झालेल्या या रक्तदान शिबिरात विशेष करून तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. कार्यक्रम सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आला. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज जयस्वाल, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाठे, बाबा कुटे, मच्छिंद्र दळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, औताडे मामा, देव इंद्र चव्हाण, भागीनाथ म्हस्के पाटील, कर्पे मामा यांच्यासह राजकीय व सामाजिक लोकांनी उपस्थिती दर्शविली. या रक्तदान शिबिरात परिसरातील 47 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. लोकमान्य रक्तपेढीच्या डॉक्टरांनी यावेळी रक्त संकलन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिट्टू दादा युवा मंचचे ज्ञानेश्वर शेळके, अनिकेत बोंद्रे, रोहन भालेराव, अजय शिंदे, पवन सपकाळ, दीपक ठोके, महेश व्यवहारे,अमोल मस्के, आदित्य पाठे, ऋषिकेश दुधाळे, प्रदीप देवकाते, सागर चोपडे, गणेश तुपे, शैलेश गायकवाड, अजित शिंदे, नवनाथ खोबरे, नितीन आमटे, सुधीर कडू, रवी चौधरी, सचिन बोडके, कमलेश मिसाळ, रफिक शेख, नवनाथ भुजंग, तेजस पाटील, ऋषिकेश धुळगुंडे, अक्षय शिंदे, अक्षय खोरकर, पंकज केरे, सचिन आळंजकर, राजू काळे, सचिन मुंडे, सौरभ वाघ, नितीन परब, अविनाश कोकाटे, ऋषिकेश कांबळे, स्वप्निल कांबळे, वैभव पाटील, गौरव देवडे, करण ढापसे, विनोद बोडके, भैय्या गावंडे, आकाश हाडोळे, संतोष यमुलवाड, सागर सभादिंडे, संदीप पवार, मारुती सुंदरवाड, आकाश भरकड, कार्तिक पवार, अनिकेत शिंदे, अभिषेक शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले.
