वाळूज येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

वाळूजमहानगर – वाळूज येथे राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी बुधवारी ता.(24) आगस्ट रोजी साजरी करण्यात आली.
प्रथम संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी यांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे सुनील राऊत, संतोष गवळी, सुदाम खजिनदार, अक्षय राऊत, राजू तोडकर, किरण राऊत, दत्तु राऊत, राजु राऊत, भाऊसाहेब राऊत, संजय खजिनदार, बाबासाहेब शिंदे, ललित राऊत, सुभाष जाधव, संतोष जाधव, कारभारी खजिनदार, संजय राऊत, पोपट राऊत, उत्तम खजिनदार, रवींद्र राऊत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी दिलीप गवळी यांनी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने विविध प्रश्नावर चर्चा करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
फोटो ओळ – वाळूज येथे श्री संत सेना महाराजांना अभिवादन करताना दिलीप गवळी यांच्यासह नाभिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.